नि:शब्द...
घटना क्र.1).दिल्ली. 16 डिसेंबर 2012. दक्षिण दिल्लीत रहाणार्या एका युवतीचा (निर्भया) चालत्या बसमध्ये राम सिंग, मुकेश सिंग, विनय शर्मा, महम्मद अफरोज, पवन गुप्ता, अक्षय ठाकूर या सहा नराधमांनी पाशवी बलात्कार करून तिला आणि तिच्या मित्राला चालत्या बसमधूनच फेकून दिले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. तर मित्र गंभीर जखमी झाला.
घटना क्र.2). महाराष्ट्र. 13 जुलै 2016. कोपर्डीत राहणार्या 15 वर्षांच्या एका मुलीची जितेंद्र शिंदे, संतोष आणि नितीन या तिघांनी बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली.
घटना क्र. 3). जम्मू काश्मीर. 10-17 जानेवारी 2018. कठुआ येथील एका आठ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून आरोपी पुजारी, पोलिस अधिकारी, पोलिस शिपाई, पुजार्याचा मुलगा आणि नातवाने तिचे आठवडाभर शरीराचे लचके तोडले आणि शेवटी तिचा खून केला.
घटना क्र. 4). तेलंगणा. गुरुवार 28 नोव्हेंबर 2019. रोजीच्या रात्री हैद्राबादजवळील शमशाबाद टोल नाक्यावर आरोपी महम्मद अरिफ(चालक), जोल्लू नवीन (क्लिनर), चेन्नाकेशवलू (चालक) आणि जोल्लू शिवा (क्लिनर) यांनी प्रियांका रेड्डी नामक एका पशुवैद्यक असलेल्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह पेटवून दिला.
या चारही घटनांचा इतिहास पाहिला तर तो वाचून अंगावर काटा आणणारा आहे. म्हणूनच या घटना घडल्यानंतर सारा देश हादरवून सोडला आहे, कारण बळी पडले दुर्दैवी हे विविध जाती धर्मातील असून स्त्री ही त्यातली समान बाब आहे. आणि त्यातल्या बळी या आपल्याच मुली -बहिणी आहेत आणि आपल्याच समाजातील आहेत. तर गुन्हेगारही एकाच ठरावीक जातीतले नसून ते एका समान पाशवी मानसिकतेतले आहेत. हे इथे उल्लेख करण्यासारखे आहे. या घटनेने आजचा समाज खरोखर ‘नि:शब्द’ झालेला आहे. जिथे परस्रीला मातेसमान, देवीसमान मानण्याची संस्कृती असणार्या आपल्या लोकशाहीच्या देशात अशा घृणास्पद घटना घडतात तेव्हा मनातील विचार लेखणीच्या माध्यमातून कागदावर उमटवताना आपले शब्द जागच्या जागी थिजल्यासारखे वाटतात आणि लेखणी अबोल झाल्यासारखी भासते.
निर्भया,कोपर्डी,कठुआ,आणि आता घडलेली ही घटना संपूर्ण मानवजातीला धिक्कार करायला लावून अबोल बनवते. समाजात प्रचंड आक्रोश आहे. कॅण्डल मार्च, निदर्शने काढली जाताहेत. समाजमाध्यमे, दुरचित्रवाणी, आकाशवाणी व वृत्तपत्रात याचा निषेध व्यक्त करीत प्रशासकीय यंत्रणेला जाब विचारत आहेत. या घटनांची चर्चा होते आणि होत रहाणार. मग प्रश्न येतो तो आपण महिलांचे सक्षमिकरण केले, त्या सक्षम होताहेत, त्या सबला बनताहेत याचा. हेच का ते? मुली,महिला शिकल्या,साक्षर झाल्या, नोकरी, व्यवसाय, उद्योग करू लागल्या. मानाची पदे भूषवू लागल्या. यामुळे वैचारिक पातळीत बदल झाला. चूल आणि मूल ही संकल्पना मागे पडून त्या दखलपात्र झाल्या. या निमित्ताने त्या वेळीअवेळी घराबाहेर राहू लागल्या. आर्थिक सुबत्ता आली. त्या आत्मनिर्भर झाल्या. जागतिकीकरणाची कवाडे उघडल्याने जग मोकळे झाले. आपल्या देशानेही त्याचा स्विकार केला. मग असे असेल तर त्या ‘या’ समाजात वावरताना सुरक्षित आहेत का? नसतील तर या बदलाचा उपयोग काय, अशा विचार मनात येतो. रात्री अपरात्री त्या कामावरून घरी परत येत असताना अशा हिंस्त्र घटना घडत असतील तर महिला सबलीकरणाच्या बाता मारणारे आपण नि:शब्द व्हायचे का? आता पोलीस,कायदा प्रशासन त्यांचे काम करेल. आरोपींना कायद्याने आहे ती शिक्षा,दंड होईल. पण ही वरवरची मलमपट्टी नाही का? ह्या घटना थांबणार कधी? यावर कायमस्वरूपी उपाययोजना नाही का? याचे उत्तर याच्या मुळाशी गेल्याशिवाय मिळणार नाहीत. ते कायद्याच्या दृष्टीने किंवा सामाजिक स्तरावर शोधून मिळेल.
मनुष्याच्या जडणघडणीत वैयक्तिक व सामाजिक संस्काराचा खुप मोठा वाटा असतो. आपल्या संस्कृतीनुसार आपली जडणघडण होते.
आधुनिकीकरणाच्या लाटेत तंत्रज्ञान आले. सामाजिक जीवनमान उंचावले. मनोरंजन,संदेशांची देवाणघेवाण यांनी समाजाचे रुप पालटले.पण हेच तंत्रज्ञान दुधारी शस्त्रासारखे विध्वंसही करू लागले आहे. त्याच्या वापराने जीवनमान सुसह्य झाले,उंचावले पण दुसरीकडे त्याच्या अतीवापरावर नियंत्रण सुटले. त्यावर कुणाचाही वचक राहिला नाही. सुरवातीला कुतुहल वाटणार्या गोष्टी सवयीची झाल्या. समाज या लाटेवर स्वार होऊन चौफेर उधळू लागला. बेफीकीर झाला.
मानसशास्त्र सांगते कि एखादी आकर्षक गोष्टीचे चित्रण तुमच्यासमोर वारंवार झाले तर त्या गोष्टीबद्दल तसेच मत तयार होऊ लागते. त्याबद्दल जाणून घेण्याची वृत्ती निर्माण होते. मग त्या माध्यमांमधील जाहिरातीतील असो वा चित्रपटांमधून दाखवलेले अश्लील हावभाव किंवा चित्रण असो. अशा व्यक्त न होणार्या गोष्टींचे दृष्यरूप जर समोर आले तर मेंदू बधीर होऊन जातो. मग याचा अतिरेक झाला तर सद्सद्विवेकबुद्धी गहाण पडून मग बेशुध्द पडलेला आपला पशू मेंदू आळस झटकत जागा होतो. नि मग संंधीची वाट पहायला लागतो. मग असे आभासी दुनियेतले चित्ररूप आपली मानवी मेंदू वास्तवात ते खरे समजून मग संधी मिळेल तिथे त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. अगदी प्रत्येकाच्या घराघरात दिवसभर असे विषारी खाद्य दुर्दैवाने या ना त्या प्रकारे आज सहज उपलब्ध होतेय. चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिराती इत्यादींच्या माध्यमातून याचा सतत भडीमार चालू असतो. यावर समाज,सरकार,पोलीस प्रशासनाने अंकुश लावण्याचा प्रयत्न केला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पळवाटा शोधून त्यांना वेड्यात काढले जाते.
पण आपण हे विसरतोय की अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरेकामुळेच आपण बेभान होतोय. त्यामुळेच व्यभिचार वाढतोय. दुसर्याकडे आहे ते माझ्याकडे नाही ह्या भावनेतून असुया, तिरस्कार वाढतोय. गुन्हा घडल्यानंतर शिक्षा होण्यास होणारा विलंबामुळे कायद्याचा धाक कमी झालाय. ‘काही केले तरी फरक पडत नाही’ या बेपर्वाही भावनेमुळे गुन्हेगारांची भीड चेपते आणि पुढे तो मोठा गुन्हा करण्यासाठी सहज तयार होतो. यात दोन गोष्टी होतात. एक ठरवून केलेला गुन्हा आणि दुसरा नकळतपणे हातून घडलेला गुन्हा.
म्हणूनच आधी वाहत चाललेल्या सोशल मीडियाच्या वापरावर सप्रमाण बंधने आणायला हवीत. सेन्सॉरने कडक नियमांची अंमलबजावणी करायला हवी. झालेल्या गुन्ह्यात तात्काळ जबर शिक्षेची कार्यवाही व्हायला हवी. कारण उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो. कायद्यातल्या पळवाटा काढून टाकून अशा गुन्ह्यात जबर शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी केली तरच समाजात प्रभावी संदेश जाऊन अशा उधळलेल्यांना अंकुश बसेल. यासाठी शालेय स्तरावर मूल्यशिक्षणावर भर द्यायला हवा. समाज माध्यमांच्या वापराबरोबरच समाज जागरूकता पटवून द्यायला हवी. तरच येणारी पिढी सुसंस्कारिक,सजग,सशक्त,सामाजिक भान असणारी बनवताना पुन्हा पुन्हा ‘नि:शब्द’ व्हायची वेळ येणार नाही.
- मारुती वि. पाटील

No comments:
Post a Comment